मुरूडमध्ये अवकाळी पाऊस

0

बोर्ली । ऑक्टोबर अखेरीस थंडी सुरू होऊन आठवडा पूर्ण होत नाही. तोच आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. साडेसात आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले. थंडीचा जोर काहीसा वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी बोर्ली मांडला विभागासह मुरूड तालुक्यात झालेल्या पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले.

त्यामुळे गारवा आणखीणच वाढला आहे. परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. आठवडाभरापासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. सकाळी बोर्लीमांडला, कोर्लई, वळके, नांदगाव, चेहर, सुपेगव, आदी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. बोर्ली येथे जोरदार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारंबळ उडाली.