मुलगा शेतकरी चालेल पण निर्व्यसनी हवा – ना. गुलाबराव पाटील

0

जळगाव । मुलगा हा शेतकरी व व्यवसायीक असला तरी चालेल पण दोन वेळचे जेवण आणि निर्व्यसनी असला पाहिजे, त्याने मुलीच्या मनातील भावना समजवून घेण्याची तयारी असली पाहिजे, असे प्रतिपादन सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज व श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बी.एस.एन.एल.ऑफिसजवळ राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात वधू-वर यांच्यास पालकांना उद्देशून ते बोलत होते.

मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश पाटील, युवा कोळी समाजाचे अध्यक्ष चेतन पाटील, संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश सोनवणे यांच्यासह सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित आहे. दरम्यान मान्यवरांच्याहस्ते कोळी समाजातील वधू-वर साठी ‘ऑनलाईन नोंदणी वेब पोर्टल’चे उद्घाटन करण्यात आले.

30 जिल्ह्यातील वधू-वरांचा सहभाग
30 जिल्ह्यातून समाजातील वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित असून यातून मुला-मुलींना योग्य जोडीदाराची निवड करण्याची संधी देण्यात आली आहे.
नामदेव सोनवणे, भगवान सपकाळे, संदीप कोळी, सुभाष सोनवणे, राजू सोनवणे, भैय्या सोनवणे, दीपक सोनवणे, मनोज सपकाळे, कडू कोळी, खेमचंद सपकाळे, विशाल सपकाळे, किरण सोनवणे, प्रमोद बाविस्कर, गोपाल सपकाळे, निलेश तायडे आणि चंद्रकांत सपकाळे आदींनी मेळावा यशस्वितेसाठी परीश्रम घेत आहे.