मुंबई :- आपल्या मुलांची जन्मजात शैक्षणिक शैली आणि क्षमता ओळखून त्यानुसार सुयोग्य माहितीच्या बळावर पालकत्त्व आणि शैक्षणिक पद्धती ठरविण्याकरिता पालकांना सक्षम बनविण्यासाठी जेनेक्स्ट स्टुडंट्स हे देशातील पहिले सक्षम गृह शिकवणी व्यासपीठ साहाय्य करणार आहे. आपल्या पाल्यांमधील सुप्त क्षमतेला ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यात पालकांना सक्षम बनविण्यासाठी जेनेक्स्ट स्टुडंट्सने ब्रेनवंडर्स या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा आलेख बनवण्यासाठी आणि शिक्षणाचे उत्तम मार्ग अवलंबण्यासाठी भारतातील सर्वोत्तम शाळांमध्ये डीएमआयटी चाचणीची ओळख करून देणाऱ्या यूएस पेटंट असलेल्या एकमेव अध्यापनशास्त्र बहुबुद्धिमत्ता चाचणी (डीएमआयटी) कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
पालक आपल्या मुलांबाबत सहज गैरसमज करून घेतात. कारण, ते मुलांमधील कुतुहलता, आक्रमकता, बंडखोर स्वभाव आदी जन्मजात गुण ओळखण्यात अपयशी ठरतात. ब्रेनवंडर्स हे डीएमआयटीच्या विश्लेषणासह योग्यता आणि बुद्ध्यांक चाचणी प्रदान करते. मुलाचे सर्व गुणधर्म आणि बुद्धिमत्ता प्रतिचित्रित करता येऊ शकते जी शिक्षणाचा योग्य मार्ग समोर ठेवण्यास सक्षम ठरू शकते. याशिवाय, लहान आणि दीर्घकालीन समस्या सोडवण्यात मदत करण्याकरिता व्यावसायिक सल्ला आणि सूचनाही दिल्या जातील.
या सहयोगाबाबत बोलताना जेनेक्स्ट स्टुडंट्सचे सह-संस्थापक आणि संचालक अली असगर कागझी म्हणाले, “तांत्रिक हस्तक्षेपाच्या मदतीने, जर पालक आपल्या पाल्यांमधील सुप्त क्षमतेला ओळखण्यात सक्षम झाले, तर त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्यातील क्षमतेनुसार प्रशिक्षित करणे सहज सोपे होऊ शकते. ब्रेनवंडर्ससोबतचे आमचे संघटन पालकांना त्यांच्या मुलांच्या संगोपनात योग्य दृष्टिकोन बाळगण्यात साह्यकारक ठरू शकते. डीएमआयटी चाचणी हा शास्त्रीयदृष्ट्या-सिद्ध मूल्यांकन कार्यक्रम आहे जो मुलांच्या अंगभूत गुणांना चोखपणे समजून घेऊ शकतो. जेव्हा पालक त्यांच्या मुलांमधील बुद्धिमत्ता आणि शिकण्याची शैली ओळखून त्यांना प्रतिसाद देण्यात सक्षम होतील, तेव्हा शिक्षण कमी निराशाजनक आणि फलदायी होईल. आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता ओळखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या हजारो पालकांना या उपक्रमातून बराच फायदा मिळेल. अशा पालकांसाठी आमची ही भागीदारी सर्वोत्तम सहाय्यक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”