मुलांच्या खेळण्यावरून महिलेला मारहाण : महिलेविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील दादावाडीत लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शाब्दीक वाद वाढल्यानंतर महिलेला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुका पोलिसात गुन्हा
कविता भगवान पाटील (45, श्रीराम नगर, दादावाडी जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 3 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास लहान मुलांचे खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले. या कारणावरून लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कविता पाटील यांनी लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही) यांनी तोंडावर चप्पल मारली व शिवीगाळ करून मारहाण केली. यात कविता पाटील ह्या जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला मुक्का मार बसला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कविता पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने लक्ष्मी विनोद (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार दीपक कोळी हे करीत आहे.