मुलांच्या हातातील राख्या सक्तीने काढायला लावल्या

0

नवी मुंबई :- रक्षाबंधन च्या दिवशी हातात बांधण्यात आलेल्या राख्या शालेय मुलांनी दुसऱ्या दिवशीही शाळेत आणल्या असत्या त्या सक्तीने काढून टाकायला लावल्याचा प्रकार नेरूळ मधील डॉन बॉस्को शाळेत उघडकीस आला आहे.या प्रकाराने एकच खळबळ माजली असता शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाना घेराव घातला आणि या प्रकरणी जाब विचारला.

यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आल्याने अनेक ठिकाणी रविवारी अथवा मंगळवारी रक्षाबंधन साजरे करण्यात आले.रक्षाबंधन च्या दिवशी बहिणीने भावाला हातात बांधलेल्या राख्या अत्यंत सक्तीने नेरूळ सेक्टर ४२ मधील डॉन बॉस्को शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेने काढायला लावल्या,ज्यांनी काढल्या नाहीत त्यांच्या हातातल्या राख्या कापण्यात आल्या आणि त्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्या. शिक्षिकेचा हा प्रकार पाहून समस्त मुलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले.त्यांनी सदर प्रकार आपल्या पालकांना सांगितला असता पालकांनी या प्रकरणाचा जाब त्या शिक्षिकेला विचारला मात्र यावरही पालकांचे समाधान न झाल्याने त्यांनी अखेर या प्रकरणाची तक्रार शिवसेना व भाजप च्या पदाधिकारयाना केली.सदर प्रकार समजताच शिवसेनेचे शहर अध्यक्ष विजय माने, नगरसेवक काशिनाथ पवार,माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर,परिवहन सदस्य समीर बागवान,शाखा प्रमुख विशाल विचारे,भाजप नवी मुंबई युवा जिल्हाअध्यक्ष दत्ता घंगाळे यासह अनेक पदाधिकारयानी गुरुवारी सकाळी डॉन बॉस्को शाळेच्या फादरला घेराव घातला.आणि या प्रकरणाचा जाब विचारत संबधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली.पदाधिकार्यांचा रौद्र अवतार बघून अखेर शाळेने नमती भूमिका घेत त्या शिक्षिकेला बोलावत तिला मुलांची आणि पालकांची माफी मागायला लावली. शिक्षिकेने झालेल्या प्रकाराची माफी मागितली असता तिच्याच हातून उपस्थित नागरिकांना राखी बांधण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यावेळी त्या शिक्षिकेने उपस्थित भाजप पदधिकारी आणि इतरांना राखी बांधली.पुन्हा असा प्रकार घडायला नको,सर्व सन शाळेत साजरे व्हायला हवेत असा इशारा शिवसेनेचे शहर अध्यक्ष विजय माने यांनी डॉन बॉस्को शाळेच्या फादरना दिला.

नेरूळ सेक्टर ४२ मधील डॉन बॉस्को ही शाळा कैथलिक धर्माची असून या ठिकाणी काही प्रमाणात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जातो.रक्षाबंधन च्या अगोदर फ्रेंडशिपडे साजरा झाला.त्या फ्रेंडशिप च्या मुलाच्या हातात असलेल्या पट्या तशाच होत्या,मात्र त्या नंतर साजरा झालेल्या रक्षाबंधन च्या राख्या मुलांच्या हातातल्या काढायला लावल्या.चांगले सण साजरे करायचे सोडून नको त्या प्रथा पाडल्या जात आहे,त्यामुळे सर्व सण साजरे करण्यात यावे आणि त्यांची जपणूक केली जावी असा इशारा सेनेकडून देण्यात आला आहे.
काशिनाथ पवार – शिवसेना नगरसेवक

रक्षाबंधन च्या दिवशी मुलांच्या हातातल्या राख्या अत्यंत सक्तीने काढायला लावण्यात आल्या असल्याची माहिती आम्हाला पालकांकडून मिळाली.सदर प्रकार विचित्र असल्याने आम्ही त्या शाळेत धाव घेतली आणि या प्रकरणाचा जाब शाळेच्या फादरना विचारला.त्यावर शाळेच्या शिक्षिकेने माफी मागितली असून रक्षाबंधन ही साजरी केली आहे.पुन्हा शाळेत असे प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.
दत्ता घंगाळे – नवी मुंबई युवा जिल्हाध्यक्ष, भाजप