रावेर । आपल्या मुलांना सुसंकृत, बुध्दीवान घडविण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊ होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडवितांना जिजामातेंनी देखील यावर भर दिला होता असे सांगत गौरीथोरात यांनी एकपात्री नाट्य प्रयोगातून जिजाऊंचे संपूर्ण आत्मचरित्र प्रेक्षकांसमोर उलगडले. येथील माऊली फाउंडेशनतर्फे आदित्य इंग्लिश स्कुल येथे राजमाता जिजाऊच्या धगधगत्या संघर्षमय जिवन प्रवासावर आधारित संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आणला. यावेळी साक्षात जिजाऊंचा जीवनपट पाहतांना प्रेक्षक भारावले होते.
नाट्यप्रयोगाने प्रेक्षक भारावले
यावेळी गौरी अशोक थोरात यांनी एक पात्री नाट्य प्रयोगातून जिजामातेचा संपूर्ण आत्मचरित्र एक तासाच्या कार्यक्रमातुन जनते समोर मांडला गौरी थोरात यांच्या नाट्यप्रयोगाने उपस्थित मुले, नागरीक, महिला भारावुन गेल्या होत्या. डॉ.एस.आर. पाटील, श्रीराम पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी गायीला छत्रपतींचा पोवाडा
दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. येथील आदित्य इंग्लिश स्कुलच्या लहान मूलांनी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान भेटीचा पोवाळा सादर केला. तर वनविभागातल्या विविध योजनांमध्ये स्वयंस्पुर्तीने सहभागी झाल्याने वनविभागाने डॉ. संदीप पाटील दाम्पत्यांना ग्रीन आर्मीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राजीव पाटील, मोहन पाटील, डॉ उदयसिंग पाटील, वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, गटविकास सानिया नाकाडे, पोलिस निरीक्षक कैलास काळे, चंद्रकांत अग्रवाल, योगेश गजरे, रमेश थोरात, नगरसेविका रंजना गजरे, योगिता पाटील, सुमन पाटील, वैशाली पंडित, कांता बोरा, हेमलता राणे, सुमन पाटिल आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण चौधरी यांनी तर सूत्रसंचलन दिपक नगरे तर आभार डॉ. संदीप पाटील, डॉ योगिता पाटील यांनी मानले.