मुलांना दिला जातोय ‘अळ्यायुक्त’ पोषण आहार

0

चंंद्रपूर: नाकोडा या गावात एका अंगणवाडीत मुलांना अळ्यायुक्त पोषण आहार दिला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अंगणवाडी केंद्र क्रमांक ५ व ८ मध्ये हा प्रकार घडला आहे.

वर्षानुवर्षे एकाच बचतगटाला पोषण आहार बनवण्याचे काम दिले जात होते. राजकीय पाठबळामुळे इतरांना संधी दिली जात नाही. याचाच फायदा उचलत विद्यमान बचत गटाच्या महिला मुलांना निकृष्ट आहार देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत.

चण्यामध्ये किडे सापडले, खिचडीमध्ये अळ्या, अधिकचा आर्थिक फायदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. हा संतापजनक प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली.