मुलांना पळविणार्‍या संशयित महिलेची चौकशी

0

भुसावळ । खिर्डी येथील नागरिकांना गावात भिक मागतांना आढळून आलेली महिला मुले पळवून नेणारी असावी या संशयावरुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली होती. याप्रकरणी महिलेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात मुले पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा उठल्यापासून गावात लहान मुलांच्या पाल्यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मास्समा कृष्णा वासु मारयम्मा (वय 40, रा. आंध्रप्रदेश) येथील महिला गावात भिक मागतांना आढळून आली. मात्र ग्रामस्थांना या महिलेवर संशय आल्याने त्यांनी या महिलेस पोलीसांच्या स्वाधीन केले. तिने आपण जळगाव जवळ राहत असल्याचे सांगितले. याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करीत आहे. सदर महिला ही भिकारी असल्याचे निष्पन्न झाले असुन कोणीही घबरू नये असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी सांगितले.