मुलांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ

0

सांगवडे शाळेत वृक्षारोपण

शिरगावः सांगवडे येथील जि. प. शाळेत जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व मुलांनी झाडांजवळ उभा राहून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. विद्यार्थी वृक्ष कमिटीने वृक्ष लावून भविष्यात त्याचे संगोपन करण्याचे अश्‍वासन दिले. या कार्यक्रमाविषयी बोलताना नितीन मराठे म्हणाले की, येणार्‍या काळात जास्तीत-जास्त झाडे लावली तरच आपले पर्यावरण आणि तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

आपले सर्वांचे आरोग्य अबाधित राखले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक व्यक्तीने झाडे लावली पाहिजेत. दुसर्‍यांनाही लावण्यासाठी परावृत्त केले पाहिजे. नुसते झाडे लावली म्हणजे रोपण झाले असे नाही, तर त्यांचे संवर्धनही होणे महत्वाचे आहे. झाडांना आपल्या मुलांसारखे जपले तरच ते आपल्याला जपतात. यावेळी पाणीपुरवठा जलसंधारण अभियंता, तांदळे, सरपंच दिपाली लिमन, उपसरपंच अमोल मोकाशी, ग्रामपंचायत सदस्य शंकर राक्षे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश राक्षे व हनुमंत लिमण, संतोष राक्षे, सुरेखा जगताप, शकंर चव्हाण, राजु राक्षे, संतोष काळे, मुख्याध्यापक श्रीधर उतेकर, पदवीधर शिक्षक संदीप सकपाळ, स्वाती जगताप, अण्णा ओहोळ, उर्मिला शिरसाठ उपस्थित होते.