माजी विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन
हे देखील वाचा
निगडी : पुर्वी आयटीआयकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. आज मात्र आयटीआयला सुगीचे दिवस आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आयटीआयमध्ये शिकणार्या मुलांनी न्यूनगंडता बाळगू नये, असा सल्ला विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी दिला. निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचलित आयटीआयच्यावतीने रोल मॉडेल कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी एस.के.एफ. कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विल्सन व्हिक्टर, राजर्षी शाहू विश्वविद्यालय संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राजकुमार डावळे, मायक्रोम कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अजित मांढरे, थरमॅक्स कंपनीचे प्रशांत रायकर, कॅम्प एज्युकेशन आयटीआयचे प्राचार्य बसवराज विभूते, गट निदेशक मनीषा गाढवे आदी उपस्थित होते. कॅम्प एज्युकेशनचे माजी विद्यार्थी असलेले सौंदणकर यांच्यासह व्हिक्टर, रायकर, मांढरे यांनी यावेळी शाळेतील गतस्मृतींना उजाळा दिला. डावळे यांनी वेळेचा सदुपयोग करण्याचा मुलांना सल्ला दिला. व्हिक्टर यांनी प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यशस्वी होता येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विभूते यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञा दरेकर हिने तर आभार हनुमंत सावंत यांनी मानले.