मुलांनी पालकांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवावी

0

शिक्रापूर । शालेय मुलांनी शिक्षण घेत असताना जिद्दीने अभ्यास करत शिखर गाठणे गरजेचे असून मुलांनी पालकांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवावी, असे मत चित्रपट निर्माते नवनाथ टेमगिरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व साहेबराव शंकरराव ढमढेरे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी शिबीरात ते बोलत होते. डॉ. पद्माकर गोरे, दत्तात्रय वाबळे, जेष्ठ नेते सर्जेराव ढमढेरे, डॉ. उमेय काळे, प्रा. निलेश पाचुंदकर, प्रा. उर्मिला घोलप, सिनेकलाकार रुपेश बोरुडे, आयुब शेख, विक्रम दुपारगुडे, श्रीकांत धुमाळ, सचिन कांबळे, प्रवीण बामणे, शेरखान शेख याप्रसंगी उपस्थित होते.

…तर स्पर्धा परीक्षा देणे शक्य
मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून खूप काही शिकायला मिळते. परंतु मुलांनी त्यापासून काही गुण आत्मसात केले पाहिजेत. जिद्दीने अभ्यास करून चिकाटी ठेवल्यास नक्कीच स्पर्धा परीक्षा देणे शक्य होत असते. मुलांनी आई-वडील हे किती कष्ट करून शिकवतात तसेच शिक्षक मुलांना घडविण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. याचा विचार करून पालकांच्या व शिक्षकांच्या कर्तुत्वाची जाणीव ठेवली पाहिजे, असे देखील नवनाथ टेमगिरे यांनी सांगितले. यावेळी सिनेकलाकार रुपेश बोरुडे, आयुब शेख, शेरखान शेख यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कापरे याने केले तर प्रास्ताविक प्रेरणा म्हस्के तर ऋृग्वेद भोंगाळे यांनी आभार मानले.