सणसवाडी । मुलांमध्ये विविध प्रकारचे कलागुण लपलेले असतात. मुलांचे गुण ओळखून पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेरंगेवस्ती व मुक्तांगण फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
विविध प्रकारचे खेळ, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी शाळेत पार पडले. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मुक्तांगण फाउंडेशनच्या वतीने मुलांना खाऊ व जेवणाचे डबे देण्यात आले. त्याप्रसंगी सिने अभिनेते विजय पाटकर, मुक्तांगणचे अध्यक्ष नारायण कांबळे, सौरभ दसपुते डान्स अकॅडमी, नरेश पांचाळ यांनी कठपुतली शो दाखवून मुलांचे मनोरंजन केले. रोहित भडके व कलाकारांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले.