मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा गरजेच्या -प्रा.सीमा पाटील

0

व्हिजन अ‍ॅकेडमीच्या ‘माझा भारत’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

भुसावळ- मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा गरजेच्या असल्याचे प्रतिपादन संचालिका प्रा.सीमा पाटील यांनी येथे केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जळगाव रोडवरील श्रीनगर भागातील व्हिजन अ‍ॅकेडमीतर्फे चित्रकला स्पर्धा 12 रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना 17 ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी प्रा.सीमा पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी तसेच क्रिकेटचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी वेल्हाळेच्या महर्षी व्यास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सोनवणे होते. प्रमुख पाहुणे यावलच्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक केंद्रीय आश्रमशाळेचे प्राचार्य विनोद गायकवाड,व्हिजन अ‍ॅकेडमीच्या संचालिका प्रा.सीमा पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक देवेंद्र पाटील, प्रा.धीरज पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, धनेश पाटील उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांचा गौरव
बक्षीस मिळण्यासाठी सर्व स्पर्धक मोठ्या प्रमाणावर उत्सुक होते. मोठ्या गटात प्रथम क्रमांक दीपक रवींद्र पाटील तर द्वितीय दिवेश्री संजय कुंभार यांनी मिळवला. छोट्या गटात प्रथम क्रमांक धनश्री लखीचंद कोळी तर द्वितीय हिमांशू शंकर प्रसाद यांनी मिळवला. विजयी स्पर्धकांना बक्षिसे, शालेय साहित्य तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.