मुलाखत प्रक्रियेवर बहिष्कार

0

शिरपूर । नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकित टिडीएफ संघटनेच्यावतीने टिडीएफ संघटनेत कार्यरत असलेल्या शिक्षक कार्यकर्त्यांना डावलुन टिडीएफ संघटनेशी काहीही संबध नसलेल्या व्यक्तीस टिडीएफने आर्थिक देवाण घेवाणीतुन तिकीट देण्याचा घाट घातल्याने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील टिडीएफ संघटनेशी निगडित अनगर ,नाशिक ,धुळे ,जळगाव ,नंदुरबार मधील क्रियाशिल इच्छुक दहा उमेदवारांनी निवडणुक मुलाखतीवर बहिष्कार घालून 10 उमेदवारांपैकी कोणीही एकास उमेदवारी करून इतरांनी पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय घेण्यात आला आहे. शाळीग्राम भेरूड,आप्पासाहेब शिंदे,राजेंद्र लांडे ,भाऊसाहेब कचरे,निशांत रंधे ,आर. डी. निकम, विठ्ठल पानसरे, एम. एस. लगड, एस. बी. देशमुख, ए. एस. लाठर आदींनी उमेदवार मुलाखतींवर बहीष्कार टाकला व एकत्रित पणे निवेदन दिले.

राज्यउपाध्यक्षांच्या अध्यक्षेत निषेधसभा
याप्रसंगी इच्छुक उमेदवारांनी उमेदवार निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. याप्रसंगी टिडीएफचे राज्यउपध्यक्ष चांगदेवराव कडु यांचे अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी अनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव व इच्छुक उमेदवार आप्पासाहेब शिंदे म्हणाले की टिडीएफच्या इतिहासातील काळा दिवस आज ठरला. आम्हा 25 व 30वर्षे टिडीएफ शिक्षक संघटनेसाठी हयात घालणार्‍या प्रामाणिक लोकांना टाळुन 4 महिन्यापूर्वी संघटनेशी काही संबध ही नसतांना फक्त उमेदवारींसाठी सलगी करणार्‍यास नामधारी शिक्षकास उमेवारी देण्याचा घाट घातला आहे . याविरोधात आम्ही नाशिक शिक्षक मतदार संघातील इच्छुक 10 उमेदवारांनापैकी कोणीही एका उमेदवारास उमेदवारी देऊन विजयी करणार आहोत.

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न
याप्रसंगी भाडोत्री बाऊंन्सरचा वापर करून इच्छुक उमेदवारांना बळजबरी व दमदाटी करण्याचा व लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जेष्ठ शिक्षकनेते सुभाष कुलकर्णी,चांगदेव कडु महाराष्ट्र राज्या शिक्षक फेडरेशन उपाध्यक्ष,नंदकुमार शितोळे,प्रशांत होन,संतोष ठाणगे,सुनिल दानवे,मंगेश काळे,विजय थोरात ,उध्दवराव सोनवणे,महेंद्र हिंगे,अर्जुन भुजबळ,जनार्धन पटारे,भाऊसाहेब जिवडे,सुदाम दळवी,हरिश्‍चंद्र नलगे , सुधीर काळे यांसह नाशिक शिक्षक मतदार संघातील पाच जिल्ह्यांतील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.