मुलाचा मृत्यू

0

यवत । यवत गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या मुळा-मुठा कालव्याच्या पाण्यामध्ये तरंगताना 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. सोहेल शहानवाज इदरीशी (वय 14, रा. उरुळी कांचन) असे मुलाचे नाव आहे. सोहेल घरी न सांगता उरुळी कांचन येथे मुळा – मुठा कालव्यावर इतर मुलांसमवेत सोमवारी दुपारी पोहावयास गेला होता. त्यावेळी बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरच्यांनी उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. यवत गावच्या हद्दीत कालव्याच्या पाण्यात सोहेलचा मृतदेह वाहत येत असल्याचे आढळून आले.