मुलाची सुरक्षा महत्वाची

0

मुंबई : शाळकरी मुलांची सुरक्षितता व सामाजिक कल्याणाचा विचार करता स्कूल बस प्रमाणे स्कूल व्हॅनला सुरक्षा धोरण महत्वाचे आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करा असे निर्दश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले. वाहतुकीची कोंडी मुलांची संख्या पहाता स्कूल बस बरोबरच स्कूल व्हानची तेवढीच आवश्यक्त आहे त्या अंद करून चालणार नाही . असे मतही मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितिन जामदार यांख्या खंडपीठाने व्यक्त केले.

विद्यार्थाच्या सुरक्षतेच्या मुद्दयावर न्यायालाच्या आदेशा नंतर राज्य सरकारने नव्या स्कूल बसचे सुरक्षा विषयक धोरणा अंमलात आणले मात्र स्कूब प्रमाणे आता मोठ्या प्रमाणात स्कूल व्हॅनचा वापर केला जातो. त्या मुळे त्यांनाही सुरक्षा विषयक धोरणा बंधनकारक करावे अशी विनंती करणारी जनहित याचिका पीटीए युनायटेड फोरम या समाजीक संस्थेन उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी झाली. यावेही याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारने नव्या स्कूल बसचे सुरक्षा विषयक धोरणा अंमलात आणले असले तरी स्कूल व्हॅनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामध्ये प्रमाणापेक्षा विद्यार्थी बसविले जातात. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यावेही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून स्कूलबसच्या सूरक्षेतेचे धोरण न्यायालयात सादर केले. यावेळी स्कूल व्हॅन मालक चालकांनी राज्य सरकारच्या धोरणाला सह्हाय करणार्‍या याचिका न्यायालयात सादर केल्या. त्यांना प्रतिवादी करण्याचे याचिकाकर्त्याला निर्देश देऊन याचिकेची सुनावणी चार आठवडे जहकूब ठेवली.