मुलाच्या कानातून काढल्या अळ्या

0

कानदुखीने त्रस्त झालेल्या मुलाच्या कानातून डझनभर अळ्या कझाकस्तानमधील डॉक्टरांनी काढल्या आहेत. डॉक्टरांनी चिमट्यांच्या सहाय्याने कानातून वळवळत असलेल्या माशीच्या अळ्या काढल्या.

व्हेटेरिनियन संस्थेचे उपसंचालक आईदा अब्दीबेकोव्हा म्हणाले की किटक लोकांच्या कानात अंडी घालतात अशी बऱ्याच केस नोंदलेल्या आहेत. गेल्या महिन्यातच भारतातील डॉक्टरांनी एक व्हीडिओ व्हायरल केला होता. त्यात एका महिलेच्या कानातून कोळी (स्पायडर) काढला होता. तिला डुलकी लागली असताना हा किटक कानात गेला होता.