मुंबई : नुकतेच टीम इंडियाचा फास्टर गोलंदाज मोहम्मद शमीच्या बायकोच्या फोटोवरून वादंग उठल्यानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला देखील अशाच प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी काही दिवसांपुर्वी नवा पाहुणा आला असून एका गोंडस बाळाला इरफानची पत्नी सफा बेगने जन्म दिला आहे. इरफानने सोशल मीडियावर बाबा झाल्याचे ट्विट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. चाहत्यांनीदेखील यानंतर इरफानचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. पण आता त्याला सोशल मीडियावर शुभेच्छांसहित फुकटचे सल्लेही देण्यात येत आहेत. सैफ-करिना वादाच्या पार्श्वभुमीवर यामधील एकाने इरफानला आपल्या मुलाचे नाव दाऊद ठेवू नको असा सल्ला दिला.
सैफ-करीनाच्या मुलाच्या नावाचा संदर्भ
सोशल मीडियाच्या माध्यमातून सैफ अली खान आणि करिनाने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन अनेकांनी टीका करत नावाला विरोध केल्यामुळे अनेक वादही निर्माण झाले. एका व्यक्तीने याच पार्श्वभुमीवर इरफान पठाणला ‘मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा, पण त्याचे नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नको, हे जग हास्यास्पद असल्याचा सल्ला दिला. या ट्विटला इरफान पठाणेने देखील योग्य उत्तर दिले. त्याचे नाव काहीही असो पण एक गोष्ट नक्की आहे की तो आपल्या आजोबा आणि वडिलांप्रमाणे देशाचे नाव मोठे करेल, असे इरफानने ट्विटला उत्तर दिले. इरफान पठाणने आपल्या मुलाचे नाव इमरान खान पठाण ठेवले आहे. हे नाव आपल्या कुटुंबाच्या अगदी जवळ असल्याचे त्याने सांगितले आहे.
सोशल मिडीयावर सांगितली खुशखबर
टीम इंडियातील फास्ट बॉलर इरफान पठाण याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची चर्चा रंगली असतानाच इरफान यानेही त्याला मुलगा झाल्याची बातमी दिली आहे. ट्विट करून इरफान याने ही आनंदाची बातमी दिली. इरफान पठाण याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न केले होते. दरम्यान, इरफान पठाणने आतापर्यंत २९ टेस्ट सामन्यांमध्ये ३२.२६च्या सरासरीने १०० विकेट घेतल्या आहेत. सात वेळा त्याने एका खेळात पाच विकेट घेतल्या आणि दोनदा एका सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. इतकेच नाहीतर त्याने आपल्या बॅटींगमधूनही मोठे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत ११०५ रन्स काढले आहेत. ज्यात एक शतकही आहे.