जळगाव । दारु मुळे लग्न जुळण्यात अडचणी येत असल्याचे सांगणार्या विशाल अनिल जाधव (वय 23 रा.रामदेववाडी) या मुलाच्या डोक्यात वडीलांनी ऊस तोडण्याचा कोयता टाकून गंभीर जखमी केल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता येथे घडली. जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर बाप अनिल पुना जाधव फरार झालेला आहे.
भावाने केले रुग्णालयात दाखल
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिल जाधव हा पत्नी करुणाबाई, मुलगा विशाल, रवींद्र व मिथून असे तिघं जण रामदेववाडी येथे राहतात. अनिल जाधव याला दारुचे व्यसन असल्याने तो दररोज दारु पिवून घरी येता. सततच्या दारु पिण्यामुळे मुलगा विशाल याने ‘तुम्ही दररोज दारु पिवून येतात,व शिविगाळ करतात त्यामुळे तिन्ही भावांचे लग्न जुळत नाही’ त्यापेक्षा आम्हाला लहानपणीच मारुन का टाकले नाही? असे बोलला. हे शब्द ऐकून अनिल याने घरात ठेवलेला उस तोडण्याचा कोयता आणून ‘मी तुला आत्ताच मारु टाकतो’ असे म्हणत विशालच्या डोक्यात कोयता टाकला. रक्तबंबाळ अवस्थेत विशाल याला इतर भावांनी तातडीने जळगावातील खासगी क्रिटीकल सेंटरला दाखल केले. मुलगा रवींद्र जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरुन वडील अनिल जाधव याच्याविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.