फुलगाव गावातील दुर्दैवी घटना : कुटुंबावर पसरली शोककळा
वरणगाव- येथून जवळच असलेल्या फुलगाव येथील विनोद तायडे आपल्या कुटुंबासह मोटरसायकलवर जात असताना मागून येणार्या कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा बुधवार, 18 रोजी मृत्यू ओढवला होता. मुलाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या मातेला दुःख असह्य झाल्याने त्यांचाही मृत्यू ओढवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. फुलगाव येथील विनोद तायडे हे पत्नीसह मुलगी आजारी असल्याने वरणगाव येथे आले होते. खाजगी रुग्णालयात उपचार करून ते घरी परतत असतांना मागून येणार्या कंटेनरने धडक दिल्याने विनोद तायडे यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली होती.
पूत्र विरहाने मातेचा मृत्यू
अनपेक्षितपणे कुटुंबावर आलेल्या संकटामुळे आई नर्मदा पंडित तायडे (65) यांचा मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर तिसर्या दिवशी शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत नर्मदा यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना नातवंडे असा परीवार आहे.