मुलाच्या मृत्यूनंतर आईचा हंबरडा ; काका भोवळ येवून पडले

0

बांबरुडच्या कुटुंबियांचा सिव्हीलमध्ये आक्रोश

मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगाव – पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील तरुणाला शेतातून घरी आल्यावर उलटी झाली, गावात डॉक्टर दवाखान्यात हजर नसल्याने जिल्हा रुग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला. विशाल गणेश चौधरी (वय 16) असे मयत मुलाचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आईसह, वडीलांनी एकच आक्रोश केला. काही वेळाने रुग्णालयात आलेल्या काकाला विशाल मयत झाल्याचे कळताच रुग्णालयाच्या गेटवर ते भोवळ येवून पडले होते. रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या मन हेलावणार्‍या आक्रोशाने सिव्हील सुन्न झाले होते.

बांबरूड येथील हा राम मनोहर लोहिया महाविद्यालयात विशाल चौधरी हे राणीचे दहावीच वर्गात शिकत होता. विशालचे वडील गणेश रामलाल परदेशी व आई रेखाबाई परदेशी हे सोमवारी माहेजी येथील यात्रोत्सवात गेले होते. तर विशाल हा सोमवारी तो त्याच्या आजोबासोबत शेतात गेला होता. शेतातील काम आटोपून तो सांयकाळी घरी परतला. आईला घरी आल्यावर मळमळ होत असल्याचे सांगितले व पाणी मागितले. पाणी दिल्यावर त्याला उलटी झाली. गावातील दवाखान्यात डॉक्टर जागेवर नसल्याने त्यांनी खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात हलविले. रुग्णालयता पोहचल्यावर डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.

मह्या सोन्या गेल्या…
विशालला आपातकालीन कक्षात नेण्यात आले. रुग्णालयाच्या लोखंडी गेटजवळ विशालची आई रेखाबाई यांनी तो उठत नसल्याने त्याला काय झाले म्हणत हंबरडा फोडला. आईला उशीरापर्यंत मृत्यू झाल्याबाबत सांगण्यात आले नव्हते. वडीलांनी मृत्यू झाल्याचे कळताच आक्रोश केला. माहिती मिळातच विशालचे काका दीपक पाचोर्‍याहून सिव्हीलमध्ये आले. याठिकाणी विशालचे मृत्यूचे समजताच त्यांना भोवळ आली. सोबतच्या नातेवाईकांनी त्याला उचलून रुग्णालयात नेले. विशालचा मृत्यू नेमका कशामुळे हे कारण कळू शकलेले नाही. दरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू सर्पदंशाने अथवा काही तरी विषप्राशनाने झाल्याची शक्यता वर्तविली असून शवविच्छेदनानंतर नेमके खरे कारण समोर येणार आहे.