मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी; सोनाली बेंद्रे यांचा भाविक प्रश्न

0

नवी दिल्ली-माझा १२ वर्षाच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न आम्हाला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेही गरजेचे होते. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नव्हते. प्रत्येकवेळी आम्ही त्याच्याशी प्रामाणिक होतो. यावेळी आम्ही हाच निर्णय घेतला आणि सगळे वास्तव त्याच्यासमोर ठेवले. त्याने बातमी अतिशय संमजपणे घेतली. इतकेच नाही तर माझ्यासाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत बनला. आता अनेकदा तो माझ्या पालकाच्या भूमिकेत असतो, असे सोनालीने लिहिले आहे. या पोस्टसोबत मुलासोबतचा फोटोही तिने शेअर केला आहे.

अलीकडे सोनालीने तिचे केस कापलेत. केस कापतांनाचा इमोशनल व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. सोनाली बेंद्रेवर सध्या विदेशात कर्करोगावर उपचार सुरु आहे. आजारी असतांना ती आपल्या चाहत्यांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात आहे.