Woman molested and beaten at Erandol : Crime against four suspects एरंडोल : शहरातील एका भागातील 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करीत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचा विनयभंग करीत मारहाण
एरंडोल शहरातील एका परीसरातील 45 वर्षीय महिलेच्या घरी संशयीत आरोपी संजय चितामण गायकवाड याने घरात घुसत अश्लील शिवीगाळ करीत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पीडीत महिलेला सोडवायला मुलगा आला असता संशयीत आरोपी संजय गायकवाड याच्या सोबत असणार्या तिघांनी महिलेच्या मुलाला पकडून ठेवत मारहाण केली. या प्रकरणी संशयीत आरोपी संजय गायकवाड, दीपेश संजय गायकवाड, वैशाली दीपक जाधव, भारती संजय गायकवाड यांच्याविरोधात एरंडोल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अनिल पाटील करीत आहेत.