पाटणा : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणात राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. दिल्लीत सीबीआय ऑफिसमध्ये या दोघांची वेगेवगेळी चौकशी होणार आहे. सीबीआय 11 सप्टेंबररोजी लालू आणि 12 सप्टेंबरला तेजस्वींना प्रश्न विचारणार आहे.
सीबीआयने 5 जुलै रोजी या प्रकरणात लालू यांच्यासह 7 जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. लालू यादव यांनी रेल्वे मंत्री असताना पदाचा गैरवापर करत भूखंड मिळवल्याचा आरोप आहे. लालूंनी मेसर्स सुजाता हॉटेल्स आणि डिलाइट मार्केटिंग यांच्यासोबत हातमिळवणी करुन धोकेबाजी केली आणि गुन्हेगारी षडयंत्र रचले असाही आरोप आहे.