मुलींना कराटे प्रशिक्षण

0

शिक्रापूर । मुलींना आणि महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कोंढापुरी येथे सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. या प्रशिक्षणात जास्तीत जास्त महिला आणि मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच नंदा ढसाळ यांनी केले आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन कराटेपटूंच्या प्रात्यक्षिकांनी करण्यात आले. यामध्ये प्रशिक्षक इंटरनॅशनल कराटे चॅम्पियन मच्छिंद्र खैरनार, जगदीश खैरनार, भाग्यश्री लांडगे, वैष्णवी खैरनार, ऋतिक जाधव आणि प्रशिक्षित कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. उपसरपंच आशिष गायकवाड, मंदा गायकवाड, सतीश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.