मुलींना जन्म देणार्‍या मातांचा सन्मान

0

महिला दिनानिमित्त ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

शिक्रापुर : हिवरे कुंभार (ता.शिरुर) येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुलींना जन्म देणार्‍या मातांना दहा हजार रुपयांचा धनादेश देत सन्मान करत सत्कार करत महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले.

महिलांना आर्थिक मदत
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन 2016 ते 2017 मध्ये मुलींना जन्म देणार्‍या तिस मातांचा ग्रामपंचायत च्या वतीने चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच माया जगताप, उपसरपंच कौशल्या गुंजाळ, माजी आदर्श सरपंच अमोल जगताप, माजी उपसरपंच रुपाली गायकवाड, ग्रामविकास अधिकारी आरती गव्हाणे, सोसायटीचे चेअरमन सुनिल जगताप यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

तर यावेळी बोलाताना समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत तर हिवरे कुंभार ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी महिला असल्याची बाब देखील महिलांची मान उंचविणारी असून पुढिल काळामध्ये मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे माजी सरपंच अमोल जगताप यांनी सांगितले.