जळगाव ।मुलींनी शैक्षणिक गुणवत्ता सिध्द करुन महिलांवरील वाढते अत्याचार, हिंसेवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करावे. चोकोरीबध्द जीवनात बदल करणे हे मुलींच्या हातात असल्याने त्यांनी स्वतः मध्ये बदल करावा असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजकार्य विभाग, प्रौढ व निरंतर शिक्षण, विस्तार सेवा विभाग, मावा संस्थेच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुलींनी स्वतःमध्ये बदल करण्यासाठी वाचन वाढवावा, विविध खेळात सहभाग घ्यावा असा सल्ला त्यांनी मुलींना दिला.
लैंगिक हिंसा, छळ या विषयावर विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मत
या स्पर्धेत एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाचा विद्यार्थी सतिष अहिरे याने प्रथम क्रमांक मिळविला.या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या संचालक डॉ.अर्चना देगावकर होत्या. वक्तृत्व स्पर्धेत 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महिंलावरील वाढती लैंगीक हिंसा, छळ या विषयावर विद्याथ्यानी मत व्यक्त केली. द्वितीय क्रमांक एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश सावळे, तृतीय क्रमांक उमवी समाजकार्य विभागाची विद्यार्थींनी मोहिनी पाटील यांने मिळविले. उत्तेजनार्थ बक्षीस डॉ.आंबेडकर विधि महाविद्यालय धुळे येथील विद्यार्थी सारांश सोनार, उमवि भौतिकीयेशास्त्र विभाग योगेश्वरी पाटील यांना देण्यात आला. स्पर्धेचा समारोप प्रसंगी समाजकार्य विभागप्रमुख डॉ.शांताराम बडगुजर यांच्या उपस्थितीत होते. परिक्षक म्हणून प्रा.संबोधी देशपांडे, प्रा.श्याम सोनवणे, सुनील पाटील यांनी काम पाहिजे. सुत्रसंचालन प्रा.राजश्री पगारे, राजेंद्र दौड व रेणूका पवार यांनी तर आभार प्रा.वर्षा पालवे यांनी आभार मानले.