मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी

0

पिंपळनेर। विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेतर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या आदिवासी मुलींचे निवासी वसतिगृह इमारत मंजुर असून देखील महाविद्यालय प्रशासनाने अद्याप ही आदिवासी समाजाच्या मुलींसाठी स्वतंत् मुलीचे वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही.निवासी वसतिगृह येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन साक्री तालुका आदिवासी कोकणी समाज मंडळाच्या वतीने महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य एस.टी.सोनवणे यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार बापू चौरे, माजी सभापती शिवाजी भोये, जि.प.सदस्य योगेश चौधरी, डॉ.रंजन गावित, तुकाराम बहिरम, हेमचंद अहिरे, किरण पवार,पी.के. महाले, पुष्पा चौधरी, तुळशिराम महाले,रावजी चौरे, यशवंत भोये,प्रतिभा चौरे व कमलाकर साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी मुली पदवी शिक्षणापासून वंचित
निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून येथील वरिष्ठ महाविद्यालयीन आदिवासी मुलीसाठी निवासी वसतिगृह 4/5 वर्षांपूर्वी मंजुर असून बांधकाम केले नाही. यामुळे आदिवासी मुली पदवी शिक्षणापासून वंचित असतात. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे ही म्हटले आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून वसतिगृह प्रशासनाने सुरू करावे अन्यथा आदिवासी कोकणी समाज मंडळ साक्री तालुका व आदिवासी समाज बचाव अभियानात नाशिक शाखा साक्री यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युजीसी नवी दिल्ली व उमवि जळगाव याचेकडे ही तक्रार करण्याचे स्पष्ट केले. सोनवणे यांनी तक्रारकर्त्याना, लवकरच प्रशासनाकडून हा प्रश्न सोडवून सुविधा देऊ असे सांगितले.