मुलीची छेड काढणार्‍यास देवसेनेकडून चोप

0

नाशिक । देशात बाहुबली या सिनेमाचे प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाले आहे. देवसेनाही ही लोकप्रिय झाली असून मुलांसोबत मुलीदेखील त्यांचे चाहते झाले आहे. निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना परिसरात काही मुलींनी छेड काढणार्‍या मुलाला सामूहिक चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

रानवड परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिकणार्‍या एका विवाहित पुरुषास सामूहिक अद्दल घडवली आहे. या महाविद्यालयात नांदुर्डी गावातून काही मुली शिकण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर आरोपी योगेश पगार ईल वर्तन करत होता. मुलींचा सहनशीलतेचा बांध अखेर फुटला आणि त्यांनी शुक्रवारी आरोपीला कोंडीत गाठले. अत्याचार करणार्‍यास पोलीसांनी ताब्यात घेतले.