जळगाव। लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या मुलीची छेड काढणार्या युवकाला नागरिकांसह मुलीच्या कुटूंबियांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मुलीच्या कुटूंबियांनी युवकाला पकडून जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दुपारी कंजरवाड्यातील अल्पवयीन मुलीने बालकाला शाळेत सोडून घराकडे जातांना रामानंदनगर येथील युवक तिचा पिछा करत होता. त्यातच कुणीतरी पाठलाग करत असल्याचा त्या मुलीला संशय आला. त्याने मुलीची छेड काढली. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने रडत-रडत घर गाठून संपूर्ण प्रकार कुटूंबियांना सांगितला. कुटूंबियांनी लागलीच युवकाचा शोध घेत त्याला जाब विचारत चांगलाच चोप दिला. यासोबतच युवकाने मुलीची छेड काढण्याचा प्रकार परिसरातील नागरिकांना कडताच त्यांनीही चांगलाच चोप दिला. यात युवकाचे कपडे देखील फाटले. यानंतर त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देवून त्या अल्पवयीन मुलीने युवकाविरूध्द तक्रार दाखल केली.