मुलीच्या पाहिल्या वाढदिवशी जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप

0

जळगाव । गावातील जिल्हा परीषदे शाळेत शिकून मोठ्या शहरात नोकरी करणारे अनेकजण असतात. मात्र ज्या शाळेत आणि ज्या गावातून आपण मोठे झालो त्याचा गावाचा विसर पडतो. आपल्या मुलीचा पाहिला वाढदिवस मोठा न करता साध्यापद्धतीने व स्मरणात राहिल असा विचार करून आसोदा येथील माहेर असलेल्या व बामणोद येथील सासर असलेल्या कुंदन भंगाळे व पल्लवी भंगाळे या दाम्पत्याने आपल्या मुलाचा पाहिला वाढदिवस 1 जानेवारी असल्यामुळे बामणोद येथील जिल्हा परीषद मराठी व उर्दु शाळेतच मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अनोख्या पद्धतीने मुलीचा पाहिला वाढदिवस साजरा केला.

शाळेतील मुलांसोबत राहून दिवस घालवला
कुंदन भंगाळे हे मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला आहेत तर पल्लवी भंगाळे ह्या मुंबई महिला पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. 1 जानेवारी 2017 रोजी त्यांची मुलगी प्रांजल हीचा पहिला वाढदिवस होता. मात्र हा वाढदिवस साध्यापद्धतीने व स्मरणात राहिल अशा पद्धतीने करण्याचे सौ. भंगाळे यांना वाटत होते. त्यानुसार त्यांनी नातेवाईकांशी बोलून गावाकडे जावून एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविल्यानंतर यावल तालुक्यातील बामणोद येथील जिल्हा परीषदेच्या मराठी व उर्दू शाळेत गरजू विद्यार्थ्यांना पॅड, कंपास, वही, पेन, पेन्सील याप्रमाणे जवळपास 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संपुर्ण दिवसभर शाळेत राहून मुलांशी गप्पा गोष्टी करत दिवस घालवला. आपण समाजाचे काही देणे लागतो व ज्या शाळेत आपण शिकून लहानाचे मोठे झाले पण शाळा व गावाकरीता काहीतरी केले पाहिजे अशी भावना ठेवून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून काही मदत करावी या उद्देशाने आपल्या मुलीचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

यांची होती उपस्थिती
भंगाळे दाम्पत्याने मुलीच्या वाढदिवशी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय वाटप केल्यानंतर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परीषद मराठी शाळेचे केंद्र प्रमुख श्री. तायडे, उर्दू शाळेचे केंद्र प्रमुख खान सर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, कुंदन भंगाळे, पल्लवी भंगाळे, धनंजय कोल्हे, गावातील ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व भंगाळे परीवार उपस्थित होते.