जळगाव । तीन मुलींचा पिता असलेल्या कर्जबाजारी रिक्षाचालकाच्या अडचणी हेरुन सैलानीबाबाच्या वार्याची भीती घालत रिक्षाचालकाच्या अठरावर्षीय मुलीवर अत्याचार करणार्या सत्तरवर्षीय संशयितास आज न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, अत्याचाराचे प्रकरण खूपच जुने असल्याने त्यात दोषारोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र, जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. शहरातील शिवकॉलनी येथे भाड्याच्या घरात रहिवासी रिक्षाचालक पत्नी व तीन मुलींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता. सेंट्रल बँकेतून रिक्षेसाठी कर्ज घेतले होते, त यामुळे बँकेचे अधिकारी हप्त्यांसाठी तगादा लावत असल्याने प्रचंड तणावात असलेल्या ….अडचण सेंट्रल बँकेतील तत्कालीन कॅशिअर सुरेशसिंह शिवसिंह राजपूत याने हेरली. आपल्या अंगात सैलानी बाबाचे वारे येत असल्याची बतावणी करुन त्याने या कुटुंबाला अनेक भूलथापा दिल्या.
12 साक्षीदार तपासले
….यांच्या अठरा वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवत राजपूत याने तिच्यावर सलग तीन वर्षे अत्त्याचार केला व त्यातून जन्मलेल्या मुलीस ख्रिश्चन मिश्नर्यांना सोपवले होते. पीडित तरुणीचे लग्न झाल्यानंतरही राजपूतने तिच्यावर पाळत ठेवली. नंतर ही बाब तिच्या पतीच्या निदर्शनास आल्याने त्याने तिला विश्वासत घेत विचारपूस केल्यावर या बाबा’चे कारनामे उघड झाले. पतीच्या पुढाकाराने या तरुणीने 26 एप्रिल 2010 रोजी जिल्हापेठ पोलिसांत अत्याचार, जादूटोणाविरोधी कायदा, फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून राजपूतला अटक करण्यात आली. सहा महिने कारागृहात न्यायालयीन कोठडीत राहिल्यावर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. खटल्याचे कामकाज न्या. के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात होऊन सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. केतन ढाके यांनी तब्बल 12 साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली. त्यातून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन त्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. आरीफ अब्दुल्ला, ऍड. अरुणसिंह राजपूत यांनी काम पाहिले. पीडितेचा जबाब व साक्ष, गुन्ह्याचे तपासाधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक शंकर नारायण सूर्यवंशी, घरमालक, पंच, वैद्यकीय तपासणीचे डॉक्टर असे बारा साक्षीदार, पंचाचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले.