मंचर । अकरा वर्षीय मुलीवर बापानेच वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंचर येथे घडला आहे. नराधम बापाला मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर पीडित मुलगी आणि तिची 9 वर्षीय बहीण वडिलांसोबत राहत होते.
तीन महिन्यांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत नराधम बापाने रात्रीच्या वेळी मोठ्या मुलीवर अतिप्रसंग केला. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लहान मुलगी झोपली की हा नराधम बाप तिच्यावर अत्याचार करायचा. ती एवढी घाबरली होती की हा प्रकार 3-4 महिने कुणालाही सांगितला नाही. मात्र एकदिवशी तिला वेदना असह्य झाल्याने तिने वडिलांना स्पष्ट नकार दिला. तरीही वासनांध बापाने बळजबरी तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तेव्हा पीडित मुलीने मोठ-मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली.
काकीला घडलेला प्रकार सांगितला
दुसर्या दिवशी काकीने विचारले. मात्र, वडील जीवे मारतील या भितीपोटी तिने काहीच सांगितले नाही. गेल्या आठवड्यात तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिने काकीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा बापाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आली. आणि त्या नराधमाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.