मुलीस धमकावून अत्याचार करणार्‍यावर कारवाई करा

0

भडगाव । येथिल श्री. संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळातर्फे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव कांबी येथील नाभिकसमाजातील 14 वर्षीय मुलीस धमकावुन अत्याचार करणार्‍या आरोपीस कठोर शिक्षा होऊन, संबंधित भयभीत कुंटुबास पोलीस संरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनादेण्यात आले. नगर जिल्ह्यातील हातगाव कांबी ता. शेवगाव येथिल संभाजी भराट या नराधामाने त्याचेच शेतात काम करणार्‍या नाभिक कुंटुबातील 14 वर्षीय मुलीला धमकी देवुन आत्याचार केला. या नराधामास कठोर शासन व्हावे, सदरचा खटला फास्ट ट्राक कोर्टात चालवावा. भयभीत कुटूंबास पोलीस सरंक्षण मिळावे, पिडीतेच्याकुटूंबारस दहा लाखाची आर्थिक मदत मिळावी. सदर केस साठी सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती कराण्यात यावी या मागणीसाठी भडगाव तहसीलदार सी.एम.वाघ व पोलीस निरीक्षक श्री. येरुळे यांना जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना यांची उपस्थिती
यावेळी समाज अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, सुकलाल शिरसाठ, बापु महाले, निबा शिरसाठ, नारायण नेरपगारे, नारायण शिरसाठ, दिलीप शिरासाठ, प्रभाकर नेरपगारे, काशिनाथ शिरसाठ, विजय ठाकरे, राजेद्र सोनवणे,विजय पवार, सुभाष ठाकरे, कैलास चव्हाण, गोरख वेळीस, शिवाजी शिरसाठ, निलेश महाले, संजय शिरसाठ, गोकुल चव्हाण, गुलाब नेरपगारे, नंदु ठाकरे, अरुण पवार, साहेबराव सैदाणे, सुर्यभान वाघ, राजेद्र पडीत सोनवणे, तुकाराम वाघ, अनिल शिरसाठ, संजय शिरसाठ, सुनिल वाघ, दतात्रय शिरसाठ, संदीप वाघ, नारायण चव्हाण, धर्मा निकम, संजय वेळीस यांच्यासह शहर, तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.