मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकास न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । निवृत्तीनगरातील अल्पवयीन मुलीस 20 एप्रिलला तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी चार जणांविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला रविवारी न्या.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विक्की ईश्‍वर राजपूत हा निवृत्तीनगरातून 20 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात विक्की ईश्‍वर राजपूत, ईश्‍वर नारायण राजपुत, भागा ईश्‍वर राजपुत, इशरथ नारायण राजजुत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित विक्की ईश्‍वर राजपुत यास पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यानंतर आज रविवारी न्या. एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. चौधरी यांनी विक्की याला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.