मुल्ला विधी महाविद्यालय आगरकर करंडकाचे मानकरी

0

पुणे । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गोपाळ गणेश आगरकर वादविवाद स्पर्धेत सातार्‍याच्या इस्माईलसाहेब मुल्ला विधी महाविद्यालय विजेतेपदाचे मानकरी ठरले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) उपविजेतेपद मिळाले.

सुस्मिता धुमाळ आणि मृणालिनी जाधव यांनी विजेत्या संघाचे आणि आदित्य वाळुंज आणि अश्‍विनी साळुंके यांनी उपविजेत्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या झोरावत सिंग याला उत्कृष्ट वक्ता आणि स.प. महाविद्यालयाच्या हर्षदा अभ्यंकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव पर्याय आहे का, राजकीय व्यक्तिंसाठी शिक्षणाची अर्हता असावी का? आणि प्रत्येक राज्याला स्वतंत्र ध्वज असावा का? या विषयावर स्पर्धकांनी वादविवाद केला. चाळीस महाविद्यालयांनी स्पर्धेत भाग घेतला. पांडुरंग शितोळे, स्वाती जोशी, रमेश जाधव यांनी परीक्षक म्हणून काम केले. प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी प्रास्ताविक, स्वाती जोशी यांनी सूत्रसंचालन, गायत्री कुलकर्णी यांनी परिचय आणि नलिनी अंबर यांनी आभार मानले.