मुळशी भाजप माथाडी अध्यक्षाच्या घरावर गोळीबार

0

गावकर्‍यांनी एकास पकडून दिले पोलिसांत
पिंपरी-चिंचवड : माथाडी संघटनेच्या वर्चस्व वादातून पौड (मुळशी) येथील बौद्धवस्तीत आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हवेत गोळीबार करत दहशत पसरवल्याचा प्रकार मंगळवारी  रात्री घडला. भाजपचे माथाडी कामगार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष दशरथ बाळू चव्हाण यांच्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर या टोळक्यातील एकाला गावकर्‍यांनी पकडून बेदम मारहाण करीत पोलिसांच्या हवाली केले. पौड पोलिसांनी श्रीवर्धन उर्फ दादा रमेश तिकोना (वय -22) याला अटक केली तर शेखर बलकवडे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. माथाडी संघटनेच्या वर्चस्व वादातून हा गोळीबार करण्यात झाल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली.
दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळताच गावातील 3