मुसई ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्काराच्या पवित्र्यात

0

किन्हवली । येत्या 13 डिसेंबर रोजी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची एकीकडे रणधुमाळी सुरु असताना साकडबाव जिल्हा परिषद गटात समावेश असलेल्या मुसई ग्रामस्थांनी थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही मुसई ग्रामस्थांनी शहापूर तहसिलदारांना दिले आले आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या 14 गट व पंचायत समितीच्या 28 गणांचे मतदान येत्या 13 डिसेंबर रोजी होत आहे. शहापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांकरीता ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने दिग्गज नेत्यांनीही या निवडणुकीच्या प्रचारात कंबर कसायला सुरुवात केली आहे.

निर्णय घेणे अशक्य
याबाबत ग्रामस्थानी नायब तहसिलदार कोमल ठाकूर यांच्याकडे निवेदन देऊन निवडणुकीपूर्वी याचा विचार न झाल्यास येत्या 13 डिसेंबर रोजीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर म्हणाले की गट व गणाच्या समावेशाबाबत हरकती नोंदविण्याच्या मुदतीत ग्रामस्थानी हरकती अर्ज केला असता तर त्यावर काही तरी निर्णय घेता आला असता,आता निवडणुकीच्या तोंडावर हे शक्य नाही

1050 गावांचा समावेश
नव्याने झालेल्या गट व गणांच्या रचनेविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आता तर मुसई ग्रामस्थांनी या निवडणुकीत मतदानावरच बहिष्कार घालण्याचे ठरविले असून तालुक्यात पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मुसई वाडीसह समावेश असलेल्या मुसई ग्रामपंचायतीचे एकूण मतदान 1050 असून गावांचा समावेश आदिवासी आरक्षण असलेल्या साकडबाव जिल्हा परिषद गटात असलेले मुसई गाव अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिल्याने ते गाव साकडबाव गटातून वगळून मळेगाव गटात वर्ग करण्याची मागणी मुसई ग्रामस्थांनी शहापूर तहसिलदारांकडे केली आहे.