मुसलमानांनी काँग्रेसला मतदान करू नये – ओवेसी

0

हैदराबाद : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हिंदू नेते प्रचाराला बोलवत नाहीत अशी खंत व्यक्त केल्यावर आता एमआयएम नेते असदूद्दिन ओवेसींनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये असं आवाहन असदुद्दिन ओवेसी यांनी केले आहे.

काँग्रेसमधील आता २० टक्के हिंदू नेतेही प्रचाराला बोलवत नाही अशी खंत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात व्यक्त केली होती. भारतात धार्मिक तेढीचं वातावरण निर्माण होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर ओवेसींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.’ आझाद यांचं वक्तव्य सूचक असून काँग्रेसला मुसलमानांचं काहीच महत्त्व राहिलेलं नाही. त्यामुळे यापुढे मुसलमानांनी काँग्रेसला मतदान करू नये हाच याचा अर्थ आहे.’ एकीकडे गुलाम नबी आझादांना अशी वागणूक मिळताना दुसरीकडे राहुल गांधीं मध्यप्रदेशातील प्रचारादरम्यान सर्व महत्त्वाच्या मंदिरांचं दर्शन घेत आहेत. जास्तीजास्त हिंदूची मत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले असून अशा परिस्थितीत येणाऱ्या २०१९ लोकसभा निवडणुकीत मुस्लिम जनता कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.