मुसळधार पावसाने झाड पडून 6 गाड्यांचे नुकसान

0

ठाणे । गेल्या काही दिवसांपासून उसंती घेतल्यानंतर काल रात्री पुन्हा पावसाने जोर धरला. ठाण्यात गेल्या 24 तासात 47.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे झाड कोसळून एकूण 6 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

ठाण्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पाच चारचाकी गाड्यांवर झाड कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. ठाण्यातील तीनहात नाका येथील इंटरनेटी सोसायटी येथे सदरची घटना घडली आहे. काल रात्रीपासून पडणार्‍या पावसामुळे शहरातील सहा चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यातील 5 गाड्या या तीनहात नाका येथील इंटरनेटी सोसायटी येथील आहेत. तर एक गाडीच नुकसान घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील नेरा रुणवाल इस्टेट, आर मॉल येथे झाले आहे. या घटनेत गाड्यांचे जरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी जीवितहानी झालेली नाही. तर अग्निशमन दलाकडून झाड कापण्यात येत आहे.

शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या मुसळधार कोसळत असलेल्या पावसाची मागील 22 तासात 41 मिलिमीटर नोंद झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण 24 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात 2 ठिकाणी आग, 2 ठिकाणी शॉर्टसर्किट, 2 ठिकाणी झाडे पडले, 3 ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, 1 ठिकाणी पाणी भरले असून 14 अन्य तक्रारींची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली आहे.

घोडबंदर रोडवरील शरद दळवी यांच्या मालकीची एमएच 04 एचएफ 2966 रेनोल्ट क्विड या एका गाडीचे नुकसान झाले आहे. तर इंटरनेटी सोसायटीमधील सोहनी उत्तमनी यांच्या मालकीची एमएच 05, एएस – 5978 टोयोटा इनोव्हा, मनीषा गिंडे यांच्या मालकीची एमएच 04 एचएम – 2510 फियाट अवेन्चर, अनिल अशोक हेरुर यांच्या मालकीची एमएच 04 एचएक्स – 8630 ह्युंडाई आय 10, उमा हेरूर यांच्या मालकीची एमएच 04 एफए 9825 टोयोटा किर्लोस्कर आणि नेहा शर्मा यांच्या मालकीची एमएच 04 एटी – 5356 फॉक्सवॅगन पोलो या 5 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.