घाटकोपर। पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर मुंबईत आज सकाळ पासून पावसाने हजेरी लावली. पावसाच्या संततधारेने मुंबाईत अनेक ठिकाणी काही सखोळ भागात पाणी तुंबळे तर घाटकोपर पश्चिम रामनगर ब येथील प्रियदर्शनी सोसायटी मधील 8 फुटांची भिंत कोसळल्याची घटना घडली.
सोसायटी मधील दीपक कदम आणि सुनील वर्तक यांच्या घरा समोर हि भिंत कोसळली. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास हि घटना घडली. भिंत कोसळली सुदैवाने त्या दरम्यान कदम आणि वर्तक यांचे दोन्ही दरवाजे बंद होत.दुपारी कदम आणि वर्तक यांच्या घरातील सदस्य गाढ झोपेत असल्याने बंद दरवाजा असताना हि भिंत कोसळली . दरम्यान यावेळी कोणतीही जीवित घटना घडली नाही. यावेळी घटना घडताच प्रभाग 123 वार्डच्या सेनेच्या नगरसेविका स्नेहल मोरे यांनी घटना स्थळी धाव घेतली . यावेळी नगरसेविका स्नेहल मोरे यांनी पालिका कर्मचारी यांना बोलावून तात्काळ भिंतीचे पडलेले डेब्रिज बाजूला केले . दोन दिवसात प्रियदर्शनी सोसायटी मधील संरक्षण भिंत बांधून देण्याचे आश्वासन नगरसेविका स्नेहल मोरे यांनी दिले.