मुस्कान मोहिमेंतर्गत बेवारस मुलांचा लागला शोध

0

नवापूर। पोलीस अधीक्षक नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात राबविण्यात आलेली ऑपरेशन मुस्कान मोहिमे अंतर्गत बेवारस मुले,अनाथमुले यांचा शोध घेत असताना अचानक नवापूर बस स्टँड परिसरात एक 6 वर्षाचा लहान मुलगा मिळून आला.त्याला नाव गाव विचाराले तो फक्त धडगाव असे बोलत असल्याने पो.स्टे.चे पावरा समाजाचे कर्मचारी यांच्या मदतीने त्या मुलाला त्याच्या भाषेत विचारले असता त्यांचेसोबत अजून एक लहान मुलगा असल्याचे समजले. त्या मुलासह शोध घेता एक 12 वर्षाचा मुलगा मिळून आला. त्याला त्याचे नाव विचाराले तर विक्रम कागड्या राहासे व दुसर्‍याचे गणेश अजय राहासे राहणार मनवांनी धडगाव असे समजल्याने त्या मुलांचा रात्रभर सांभाळ केला.

मुलांचा ताबा आश्रमशाळेकडे
मनवांनी येथील त्यांच्या पालकांचा फोन मिळवून त्यांना सोनखांब ता.नवापूर येथील आश्रम शाळेत कालच दाखल केल्याचे समजल्याने सोनखांब येथील आश्रम शाळेचे व्यवस्थापक व शिक्षक यांना पो.स्टे.ला बोलावून मुलांच्या पालकांच्या सांगण्यावरून आश्रमशाळेचे व्यवस्थापक दासु गावित यांचे ताब्यात सदर मुलांना देण्यात आलेले आहे.पालकांचा यशस्वी शोध ऑपरेशन मुस्कान यशस्वी पार पाडले. पोलीस निरीक्षक विजयसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तातु निकम, संगीता कदम, पो .कॉ. महेंद्र नगराळे यांनी ही कामगिरी व यशस्वी तपास लावला.