मुस्लिमांच्या वाट्याची जागा राम मंदिरासाठी दान द्यावी

0

नवी दिल्ली-वादग्रस्त अयोध्या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. मुस्लिमांच्या वाट्याची जागा राम मंदिरासाठी दान करण्यात यावी, असे शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाला सांगितले. तसेच बाबरी मशीद ही मीर बाकी याने उभारली होती, ते शिया पंथीय होते. त्यामुळे मुस्लमांच्या या जागेवर शियांचाच अधिकार आहे सुन्नींचा नव्हे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिया वक्फ बोर्डाच्यावतीने वरिष्ठ वकील एस. एन. सिंह यांनी, या महान देशाची एकता, अखंडता, शांती आणि सद्भावनेसाठी अलाहाबाद हायकोर्टाने मुस्लिमांच्या वाट्याला दिलेली एक तृतीयांश जमीन राम मंदिरासाठी दान करण्याची आमची इच्छा आहे. यापूर्वीही शिया वक्फ बोर्डाने आपली हीच इच्छा व्यक्त केली होती.

शिया वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात सांगितले की, हा वाद शांततापूर्ण प्रक्रियेद्वारे मिटवण्याची आमची इच्छा आहे. यावेळी बोर्डाने स्पष्टपणे सांगितले की, बाबरीचा संरक्षक एक शिया व्यक्ती होता. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड किंवा इतर कोणीही भारतातील मुस्लिमांचे प्रतिनिधी नाहीत. तर दुसरीकडे मुस्लिम समाज आणि सुन्नी वक्फ बोर्डाच्यावतीने खटला लढवणारे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी म्हणाले, अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्ध मुर्ती मुस्लिम तालिबान्यांची उद्वस्त केल्या होत्या. त्याचप्रमाणे बाबरी मशीद हिंदू तालिबान्यांनी उध्वस्त केली आहे.