मुस्लिम कब्रस्तानसह ईदगाह ट्रस्टची निवडणुक घ्या

0

जळगाव । येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टची गेल्या अनेक वर्षापासून प्रलबित असलेली कार्यकारिणीची निवडणूक त्वरीत घेण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षातर्फे पार्टी संयोजक साजिद शेख, जिल्हाध्यक्ष रागिब अहेमद, महानगराध्यक्ष अशफाक पिजारी व युवाजन महानगराध्यक्ष दानिश अहेमद यांनी केली आहे. ट्रस्टच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या हिशोब, जमा-खर्च, वार्षिक लेखा परिक्षण (ऑडीट रिपोर्ट) चेज रिपोेर्टस् सभासदांची यादी तसेच न्यासाच्या स्थावर व जंगम मालमत्तांचे विवरण आदींचे दस्तऐवज वेळोवेळी मागणी करुन देखील ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांकडून नेहमीच विविध सबबीखाली टाळाटाळ व चालचढल केली जाते.

वक्फ बोर्डाकडे निवडणुकीची मागणी
दरवर्षी ईदच्या दिवशी ट्रस्टच्या अध्यक्षांतर्फे निवडणूकीची केवळ घोषणाबाजी करुन धुळफेक केली जात आहे. यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? असाही प्रश्‍न उपस्थित केला आहे. समाजवादी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रागिब अहेमद यांनी औरंगाबाद वफ्क बोर्डाकडे माहिती अधिकाराखाली ट्रस्टशी संबंधित संपूर्ण कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच वक्फ बोर्डाकडे लवकर निवडणूक प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. आणि यापुढे न्यायालयात आव्हान देखील
करणार आहे.