जळगाव: जिल्हा मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह जळगावची नवनियुक्त विश्वस्तांची दुसरी सभा ईदगाह च्या मैदानावर अध्यक्ष अलहाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली १५ पैकी १२ विश्वस्त या सभेला हजर होते.
एकूण 12 महत्वपूर्ण ठराव या सभेत संमत करण्यात आले त्यात वक्फ बोर्ड कडून जुन्या विश्वस्तांना मिळालेली स्टे ऑर्डर तबाबत चर्चा होऊन वकील लावून त्याला नवीन ट्रस्ट ने उत्तर द्यावे व त्यासाठी औरंगाबाद येथील वकिलांची नेमणूक करण्याचा ठराव पारित करण्यात आला तसेच जे नवीन ट्रस्टी निवडून आलेले आहेत त्यांनीही यात् पार्टी होऊन आपला वेगळा खटला दाखल करावा असा सुद्धा ठराव सभेत पारित करण्यात आले. जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांना फेर फार अर्ज सादर करण्याचे अधिकार विश्वस्तांनी सर्व संमतीने दिले आहे.
ट्रस्टच्या दैनंदिन कारभारासाठी विधि सल्लागार म्हणून एडवोकेट अकील इस्माइल यांची नेमणूक करण्याचा ठराव सुद्धा सर्वानुमते पारित करण्यात आला. ट्रस्ट च्या कार्यालयाचे रेनोवेशन करून चांगले प्रकारचे कार्यालय अब्दुल वहाब व हबीबोद्दीन इंजीनियर यांचे मार्गदर्शना खाली तयार करने बाबत ठराव पास करुन कॉप मेंबर सब कमिटी यांच्याबाबत निर्णय पुढच्या मिटींगला घेण्याचे ठरले तो पर्यंत हा विषय पोसपोंड करण्यात आला त्याचप्रमाणे ट्रस्टच्या कामकाजासाठी फुलटाइम व्यवस्थापक त्याचे मानधन निश्चित करण्यात आले त्याचप्रमाणे आयत्या वेळच्या विषयावर सर्वप्रथम ईदगाह मधून वाहन व लोक जो सार्वजनिक रस्त्या सारखा वापर केला जात आहे तो त्वरित बंद करण्यात यावा, ईदगाह मशिदीपर्यंत जी वाहने येतात त्यांना त्वरित आळा आणण्यासाठी पोल लावण्यात यावे त्याच प्रमाणे ईदगाह चे विस्तार त करण्यासाठी आवश्यक ती सुधारणा करण्याचा सुद्धा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन व मागील सभेचे इतिवृत्त फारुक शेख यांनी वाचून दाखवले त्याच सभेने सर्वसंमतीने मंजूर दिली.
सभेला खजिनदार अशपाक बागवान ,सचिव अनिस शाह, नज़ीर खान मोहम्मद ,सादिक सय्यद, उप अध्यक्ष मिर्झा रियाज़, मुश्ताक अली सय्यद तसेच विश्वस्त गुलाब फते मोहम्मद,मज़हर खान,इक़बाल बागवान,ताहेर शेख, यांची उपस्थिती होती सर्वात शेवटी आभार सचिव अनिस अहमद यांनी मानले व दुवा होऊन सभा संपल्याचे अध्यक्ष गफार मलिक यांनी जाहीर केले.