मुस्लिम महिला अधिवेशनातील ठराव पाठविला राष्ट्रपतींकडे

0

जळगाव : 4 रोजी जळगाव शहरात मुस्लिम महिलांचे जे शरीयत बचाव मोहिमेंतर्गत तीन तलाक रद्द करा या मागणीसह चार ठराव सर्वानुमते मंजूर झाले. ते ठरावाची अधिकृत प्रत व वर्तमानपत्राची कात्रणेसह ते निवेदन भारताचे राष्ट्रपती यांना सादर करण्यासाठी मुस्लिम महिलांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन ठरावाचे निवेदन सादर केले.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी यांनी सदर निवेदन व आपल्या तीव्र भावना शासनाला कळविण्याचे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात अशरुफन्नीसा अफजलखान, फरजाना अनिसशाह, हाजरा फारुख शेख, फरजाना अतिक शेख, रिजवाना बशीर बुर्‍हानी, रुखसाना रफीक पटनी, निखत्त जाकीरखान, तनुजा जाकीरखान, शकीला इकबाल शेख, गुलनाज शेख याकुब, निलोफर एम इकबाल, शबाना मुश्ताक भिरजा, नसरीन महेमूद खान, आयशा आरिफ देशमुख, जुबेदा सैय्यद चांद, नरगीसबानो, साजीद शेख, शहवार आसिफ मेमन यांचा समावेश होता.