मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाणार – इम्तियाज जलील

0

मुंबई : मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता एमआयएम पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हायकोर्टात जाऊ’, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मराठा समाजानंतर आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही आव्हान देणार नाही. मात्र, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करु’, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नवीन आकडेवारी सादर करु, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. पण मुस्लीम धर्मातील जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण देण्यास तयार आहोत, अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडली.