मुस्लीम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी यावलला मूक मोर्चा

0

यावल– मुस्लीम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी यावलला मुस्लीम समाजातर्फे मूक मोर्चा काढून तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भारत सरकार समान नागरी कायदा लागू करण्याचा ठराव पारीत करण्याचा प्रयत्न करीत असून ते भारतीय संविधानाचे उल्लंघण असून अल्पसंख्यांकाच्या हितासाठी ही बाब धोकेदायक आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून मुस्लीम पर्सनल लॉ मध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आठवडे बाजारापासून मूक मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर सुदर्शन चौक, बाबूजीपुरा, नगीना चौक, बुरूज चौक मार्गे तहसीलवर मोर्चा धडकला.

यांचा मोर्चात सहभाग
मोहसीन शेख, सुलेमानी अलताफ खान, जरीना, हुसना बाजी, शे.इकबाल पहेलवान, नसरूद्दीन भाई, जाकेरा बाजी, सैय्यद ताबीश, शेख साजीद राजू भाई, तस्लीम गनी पिंजारी, कलीम जुमा शाह, सीताराम पारधे, सायरा किरण तडवी, शेख वकार आदींची निवेदनावर नावे आहेत.