मुस्लीम बांधवांनी घडवले मानवतेचे दर्शन : परप्रांतीयांना दिले जेवण

0

खिर्डी : महाराष्ट्रातील विविध भागातून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम तसेच राज्याच्या अन्य भागात रेल्वेने जाणार्‍या परप्रांतीयांना खिर्डी, निंभोरा स्टेशन व निंभोरा येथील मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जात आहे शिवाय पाणी, बिस्कीट, फळे तसेच केळी व इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले जात असल्याने परप्रांतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुस्लीम बांधवांनी जोपासला निरंतर सेवाभाव
दोन दिवसांपासून जवळपास दहा रेलगाड्या येथे थांबल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे मदत कार्य जोमाने सुरू करण्यात आले. मुस्लीम बांधवांसह अन्य बांधवांनी या सेवा कार्यास हातभार लावला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनानेदेखील या कामाला सहकार्य केले आहे. अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जात असल्याने खिर्डीतील एका फळ विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेले जवळपास 20 क्विंटल टरबूज आपल्या राज्यात परत जाणार्‍या प्रवाश्यांना वाटप करून त्यांना दिलासा दिला. अन्नदान व खाद्यपदार्थ वाटप करताना सोशल डिस्टन्स पाळले जात असून या उपक्रमामुळे परप्रांतीय बांधवांनी समाधान व्यक्त करीत नागरीकांचे आभार मानले आहेत.