मुस्लीम महिलांनीही मते दिली आहेत, त्यांची काळजी घे

0

डेहारादून। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी मुस्लीमांशी कुठलाही भेदभाव न करण्याचा सल्ला आपल्या मुलाला दिला आहे. वनविभागाच्या फॉरेस्ट रेंजर पदावरुन निवृत्त झालेले 84 वर्षीय आनंद सिंह म्हणाले की, बुर्का घालणार्‍या मुस्लिम महिलांनीही योगीला मतदान केले आहे. त्यामुळे त्यांनी आता मुस्लीम महिलांचीही काळजी घ्यायला पाहिजे. योगींनी सर्व धर्मियांची मने जिंकली पाहिजेत. सर्वांना सोबत घेऊन काम करायला पाहिजे.

आनंद सिंह बिष्ट म्हणाले की, योगींच्या खांद्यावर आता अनेक जबाबदार्‍या आहेत. भाजप तिहेरी तलाक आणि इतर मुद्दयांच्या बाबतीत मदत करेल अशा आशेने मुस्लीम महिलांनी त्यांना मते दिली आहेत. सगळ्याच धर्माच्या लोकांनी भाजपवर विश्‍वास टाकला आहे. आनंद सिंह बिष्ट आपली पत्नी सावित्रीसह पौडी जिल्ह्यातील पंचूर गावी राहतात.

विद्यार्थीदशेपासून संघाशी जवळीक
योगी आदित्यनाथ यांचे छोटे बंधू महेंद्रसिंह बिष्ट यांनी सांगितले की विद्यार्थी असल्यापासून आदित्यनाथ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले आहेत. पदवीचे शिक्शण घेत असताना संघाशी संपर्कात आल्यावर योगींना दिशा सापडली. 5 जून 1972 रोजी जन्मलेल्या अजयसिंह बिष्ट (आता योगी ाादित्यनाथ) यांनी पौडीमध्ये शालेय शिक्शण पूर्ण केले. त्यानंतर बीएससी पूर्ण केले. एमएससी करत असताना अजयसिंह 1993 मध्ये सर्व काही सोडून गोरखपुरला आले. 1994 मध्ये सन्यांस घेण्याचा त्यांचा निर्णय पचवायाल बिष्ट कुटुबियांना काहीसे जड गेले होते.